Share

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेना; रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरूच

Published On: 

लातुर: देवणी तालुक्यात कोरोना रुग्णांना संजीवनी समल्या जाणाऱ्या रेमडिसेविर इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. तसेच यामध्ये काळा बाजारही मोठ्या प्रमाणात होत आहे. याला लगाम लावण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी सध्या जोर धरत आहे, या काळाबाजार मध्ये संबंधीत डॉक्टर, मेडिकल व नर्स व इतर कर्मचारी शामिल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात कोरोना संसर्ग दिवसागणिक वाढत आहे ऑक्सिजन रेमडिसेविर इंजेक्शनाचा प्रंचट तुटवडा निर्माण झाला आहे या इंजेक्शन ब्लॅकने विक्री होत आहे नातेवाईक मिळवण्यासाठी मेडिकेलवर चकरा मारताय याचा गैरफायदा काही डॉक्टर व काही मेडिकलवाले घेत असून आपल्या मित्रांसोबत संगनमत करुन टोळीमार्फत रेमडेसीवीर इंजेक्शनची आगाऊ रकमेने म्हणजेच १० ते १५ हजार रुपयांना एक इंजेक्शन अशी विक्री करीत आहेत. हे प्रत्यक्षदर्शनी आपण स्वत: आपल्या नातेवाईकाला उदगीर येथे दाखल केल्याने अनुभवल्याचे जीवने यांनी म्हटले आहे.

बऱ्याच वेळ नातेवाईकास संबंधित दवाखान्यात दाखल केल्यानंतर रेमडेसीवीर इंजेक्शन नसल्याचे सांगून तुमचे तुम्ही बाहेरून आणा, असे सांगितले जाते. बऱ्याच ठिकाणी विचारणा केली असता अव्वाच्या सवा भाव रेमडेसीवर इंजेक्शनचा सांगत आहेत. नाविलाजाने आमच्या नातेवाईकांनी १५ हजारास रेमडेसीवीर इंजेक्शन घ्यावे लागले. याबाबत आपण स्वत: तक्रारदार होऊन जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना विचारले असता ‘वरूनच स्टॉक कमी आहे, असे या जबाबदार अधिकाऱ्यांनीही सांगितल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!