Share

‘सरकार सांगेल ते नियम पाळू, पण पायी वारीची परवानगी द्या’ ; वारकरी संप्रदायाची मागणी

Published On: 

पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता रुग्णांचा आलेख हा काहीसा उतरता असून येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात येईल असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीपासून आषाढी वारी सह कार्तिकी, माघी आणि वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेल्या सोहळ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले असून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम केले जात आहेत. दरम्यान, आता यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच सावट कायम आहे. दरम्यान, आता वारकऱ्यांनी सरकारकडं यंदा पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असं म्हणत वारकरी संप्रदायाच्या वतीनं सरकारला तीन वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत.

राज्य सरकार सांगेल त्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी वारकरी संप्रदायानं दाखवली आहे. एवढंच नाही तर सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल, मात्र सरकारनं पायी दिंडी सोहळ्याला परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांच्या वतीनं अभय टिळक यांनी केली आहे. वारी सोहळ्यासाठी सरकारनं 500 वारकऱ्यांसह सोहळ्याला परवानगी द्यावी. कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळालं नाही तर, 200 वारकऱ्यांना परवानगी द्यावी. एवढंच नाही तर अगदीच स्थिती बिघडली तर 100 जणांना तरी पायी दिंडी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडं केली आहे.

वारकऱ्यांनी असे 3 पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ती समिती सर्वांशी चर्चा करून अहवाल देणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णयाची शक्यता आहे. पण 14 जूनला मुक्ताईंच्या पालखीचं प्रस्थान असतं, त्यामुळं 10 जूनपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट खूपच घातक असल्याचे सिद्ध झाले असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे. तर भंडीशेगाव, वेळापूर या गावांनी देखील अशीच भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!