औरंगाबाद : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात महापालिकेला याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागला. यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मिळून १२७ कोटी २४ लाख ९० हजार ९६३ रुपये इतका कर जमा झाला आहे. महापालिकेच्या तिजोरीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १६ कोटींनी घट झाली आहे. तसेच केवळ वीस टक्केच कर वसुली झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होऊ शकतो.
गतवर्षी कोरोनाने शहरात शिरकाव केला. सुरुवातीला बोटावर मोजण्या इतकी रुग्णसंख्या असतांना अचानकच रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यातच लॉकडाऊन जाहिर झाला. अनिश्चित कालावधीसाठी लॉकडाऊन वाढत गेले. सामान्य माणसांचे कंबरडे मोडले गेले. त्यामुळे कर भरणारा वर्गच भरडला गेल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर याचा मोठा परिणाम झाला.
मार्च महिन्यात सर्वात जास्त कर वसुली होते, मात्र गतवर्षी मार्च महिन्यातच कोरोना संसर्ग सुरू झाला आणि त्याचा वसुलीवर परिणाम झाला. त्यामुळे सुमारे वीस कोटी रुपयांची कर वसुली कमी झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यामुळे यंदाही दिवाळीपर्यंत पालिकेने कर वसुलीकडे लक्ष दिले नाही.
दिवाळीच्या नंतर कर वसुलीसाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र त्यातही वसुलीत वेग दिसून आला नाही. पालिकेच्या कर निर्धारक व संकलक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार १ एप्रिल २०२० ते २९ मार्च २०२१ पर्यंत मालमत्ता कराची वसुली ९९ कोटी, ४० लाख ६१ हजार ७५१ रुपये झाली आहे. यंदा १ एप्रिल २०२० ते २५ मार्च २०२१ दरम्यान पाणीपट्टीची वसुली २७ कोटी ८४ लाख २९ हजार २१२ रुपये इतकी झाली आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मिळून १२७ कोटी २४ लाख ९० हजार ९६३ रुपये इतका कर जमा झाला आहे. मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटल्यामुळे त्याचा विकासकामांवर परिणाम होईलच. यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या बांगलादेश दौऱ्यावरून वाद; निवडणूक आयोगाकडे तक्रार करत तृणमूलने केले गंभीर आरोप
- तर सीटीस्कॅन मशीन सील करणार : जिल्हाधिकारी मुगळीकर
- उस्मानाबाद जिल्ह्यात ट्रक लुटला; तांब्याचे साहित्य लंपास!
- कोरोना वाढतोय : ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी ठेवण्याचे आदेश
- ‘ते’ हस्ताक्षर मोदींच नाहीच ! काँग्रेस नेत्याने व्हिडीओ शेअर करून केली पोलखोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

