औरंगाबाद : 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत लावलेल्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. या लॉकडाऊनच्या काळात मोठे उद्योग सुरु राहणार आहे. वाळूज, पंढरपूर, शेंद्रा, चितेगाव औद्योगीक क्षेत्राच्या परिसरामध्ये सध्या कोरानाचे हॉटस्पॉट आहे. कोरोना रुग्णसंख्या येथे मोठ्या प्रमाणात असताना लाखो कामगारांना कारखान्यात बोलावून त्यांचा जीव धोक्यात नाही का ? असा सवाल खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
छोटे उद्योग, ऑटो, पान टपरीवाले, ठेलेवाले, चहावाले हे छोटे उद्योग बंद राहणार आहेत. यामुळे गरीबांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून उद्या लॉकडाऊनच्या विरोधात पूर्ण ताकतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री महाराष्ट्र लॉक करण्याचे बोलत आहे, त्यास आमचा विरोध आहे. शिवसेनेचे माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर खासदारांनी टिका केली.
खासदार म्हणाले की, गरीबांसाठी रस्त्यावर उतरा तुमच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांची भूक भागवण्यासाठी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करा आणि नंतर लॉकडाऊन लावा. पोलिसांना खासदारांनी इशारा देवून सांगितले की, आम्हाला रोखू नका आम्ही गरीबांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी सुविधा नाहीत. तर डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या 2048 जागा रिक्त आहेत. एक वर्ष कोरोनाला झाला, तरी या रिक्त जागा शासनाने अद्यापही भरल्या नाहीत. रुग्णांना योग्य सेवा सुविधा मिळाली, असते तर कोरानाची रुग्णसंख्या वाढली नसती असे बोलताना या वेळी सांगितले.
जिल्हा प्रशासन उद्योग सुरू ठेवून आर्थिक साखळी बिघाड होवू न देण्यासाठी सुट देत आहेत. पण त्यांना कामगारांच्या जीवाची पर्वा नसल्याची अशी टीका जलील यांनी या वेळी केली. पोलिसांनी मोर्चा काढण्यासाठी उद्या रोखले, तर परवा मोर्चा काढू त्यानंतर सुद्धा रोखले, तरी मोर्चा काढणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी या वेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा


