Share

‘लॉकडाऊन‘ च्या काळातही विद्यापीठाच्या परीक्षा होणार : डॉ. योगेश पाटील

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत. औरंगाबाद जिल्हयात ३१ मार्च ते ९ एप्रिल ‘लॉकडाऊन‘ असला तरीही, या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरु झालेल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बीड, जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयात या पदवी परीक्षा होत आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा होत आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यांनी औरंगाबाद जिल्हयासाठी ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू केलेला आहे.

सद्या विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. या काळात ३१ मार्च १ एप्रिल तसेच ५ ते ९ एप्रिल दरम्यान पेपर असणार आहेत. २ ते ४ एप्रिल दरम्यान सुट्टी असणार आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहणार आहेत. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तरी ही बाब सर्व संबधित विद्यार्थी, पालक, अध्यापक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच कोव्हीड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषगांने नियमांचे काटेकोरपणे पालन करुन परिक्षा घेण्यात येत होते. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत – जास्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!