परतूर – पौराणिक कथेप्रमाणे हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसी प्रवृत्तीच्या राजाला भगवंताच्या नावाचे वावडे होते अगदी त्याचप्रमाणे या सरकारला देखील भगवंताच्या नावाचे वावडे आहे की काय असा सवाल करत राज्य सरकारने वारकऱ्यांचा छळ थांबवा अन्यथा वारकऱ्यांना भागवत धर्माची पताका सरळ धरण्याची सवय आहे ती पताका उलटी करून वारकऱ्यांना हातात बांबु घ्यायला लावू नका अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला सुनावले आहे
मागील अनेक शतकांपासून पिढ्यानपिढ्या देहू येथे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजेचा कार्यक्रम होत आला आहे तोच राहणार आहे परंतु या हिरण्यकश्यपु प्रवृत्तीच्या सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत या वर्षी बीज कार्यक्रमावर बंदी घातली आहे महाराष्ट्रात सगळीकडे डान्स बार सुरू आहेत नेत्यांच्या मोठमोठ्या सभा कार्यक्रम सुरू आहे अनेक अवैध धंदे सुरू आहेत मुंबईसारख्या एका शहरांमधून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सरकार प्रशासनातील अधिकाऱ्यांना देत आहे या सर्व बाबी समोर असताना केवळ वारकऱ्यांनामुळेच कोरोना पसरतो आहे की काय? सरकारला वारकऱ्यांनी केलेलं नामस्मरण नको आहे का असा सवाल सर्वसामान्य भाविक वारकरी बांधवांना पडला आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.
वारकरी संप्रदायातील प्रख्यात कीर्तनकार बंडातात्या कराडकर, रमेश महाराज वाघ, हनुमान महाराज नाथरेकर यांच्या नेतृत्वात वारकरी शिक्षण संस्था वारकरी संप्रदाय कीर्तन प्रवचन या सर्व बाबींवर शासनाने घातलेल्या बंदी विरोधात जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजे निमित्त निषेध नोंदवला जातो आहे. वारकऱ्यांनी सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे जर ०२ दिवसात सरकारने या सर्व बंदी उठवण्यात नाही तर नाथषष्ठी पासून संपूर्ण वारकरी संप्रदाय २००० पेक्षा अधिक दिंडी चालक मालक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गावोगावी वारकरी सरकारविरोधी मोर्चेबांधणी करू शकतात. या सर्व बाबींना फक्त राज्य सरकारच जबाबदार असेल असा इशारा देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे
वारकरी संप्रदायाच्या कीर्तन प्रवचन रामकथा भागवत इत्यादी कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे या कार्यक्रमांमधून मिळणाऱ्या मानधनावर चालू असलेल्या अनेक वारकरी शिक्षण संस्था बंद पडणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी वारकरी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. हेच विद्यार्थी पुढे कीर्तनकार प्रवचनकार होऊन समाजप्रबोधनाचं काम करतात. या सरकारच्या दुर्दैवी धोरणामुळे समाजप्रबोधन पूर्णपणे थांबलेले आहेत. त्यामुळे सुद्धा समाजाचे बौद्धिक नुकसान होत आहे. सरकार मस्तवाल झाले असून केवळ वसुलीवर सरकारचा भर आहे त्यामुळे सरकारला दिलेल्या अल्टिमेटम प्रमाणे सरकारने तात्काळ कार्यवाही केली तर ठीक नसता वारकऱ्यांना नाइलाजाने आक्रमक व्हावे लागेल असा इशारा देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्य सरकार ज्या ठिकाणाहून अवैधरीत्या १०० कोटींची वसुली होते ते सर्व धंदे सुरू आणि वारकऱ्यांच्या कीर्तन प्रवचन सप्ताह वर मात्र बंदी घालत आहे. वारकरी संप्रदाय शांतताप्रिय व सहिष्णु सरकारने वारकऱ्यांना आक्रमक होण्यास भाग पाडू नये. कोरोना फक्त वारकऱ्यांमुळेच पसरतो आहे असे राज्य सरकारचे मत आहे काय? असा सवाल देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबाद जिल्हा; एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट!
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

