मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा मंगळवारी पहाटे रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा आपल्या गाडीने दिलजान हे अमृतसरहून करतारपूरकडे येत होते. यादरम्यान जंडियाला गुरु येथे त्याच्या कारला अपघात झाला आणि आपघातात ते जागीच गतप्राण झाले. दिलजान हे करतारपुरचे रहिवासी होते. हा अपघात दुभाजकाला धडक दिल्यामुळे झाल् असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मंगळवारी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास अमृतसर-जालंधर जीटी रोडवर असलेल्या जंडियाला गुरु पुलानजीक पंजाबी गायक दिलजानची कार ही दुभाजकाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की दिलजानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दिलजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानच्या या अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबीयासह चाहत्यामध्ये शोककळा पसरली आहे.
दिलजानच्या वडिलांनी सांगितल्यानुसार येत्या २ एप्रिल रोजी दिलजानचे नविन गाणे प्रदर्शित होणार आहे. या संदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी तो कारमधून अमृतसरला गेला होता. परतत असताना जीटी रोडवर त्याची कार वेगात येत होती. पुलाजवळ येताच त्याची कार अनियंत्रीत झाली. त्यामुळे दुभाजकाला धडकून ती पलटी झाली. स्थानिकांनी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आपल्या छोट्य़ाशा कारकीर्दीत दिलजानने उत्तम गाणी गायली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यानी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारने वारकऱ्यांचा छळ थांबवावा,वारकऱ्यांना पताका उलटी करून हातात बांबु घ्यायला लावू नका’
- मनपाच्या कर वसूलीत तब्बल १६ कोटींची घट, विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता
- ‘लॉकडाऊन‘ च्या काळातही विद्यापीठाच्या परीक्षा होणार : डॉ. योगेश पाटील
- ‘मागील वर्षी थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” ही प्यायले, पण आता…’; मनसेची खोचक टीका
- पूर्ण ताकतीने लॉकडाऊनच्या विरोधात मोर्चा काढणार : खा. इम्तियाज जलील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

