🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती काहीही आटोक्यात आल्या नंतर गर्दीच्या वेळा वगळता सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर वेळीच सावध होत राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच, मुंबईकरांच्या लोकल सेवेवर देखील टांगती तलवार उभी राहिली आहे.
मात्र, आता गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीटात पाच पट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR मधील प्रमुख स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म दंड वाढण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर १० रुपयांऐवजी ५० रुपये इतके प्लॅटफॉर्म तिकीट आकारले जाईल. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले असून हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकली नाही
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात, एखाद्या राज्यमंत्र्यांसारखं वागू नका’
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली

