Share

साडे पाच कोटींच्या भ्रष्टाचारातील मुख्याधिकारी जेरबंद, वर्षापासून होता फरार

Published On: 

🕒 1 min read

बीड : जिल्ह्यातील माजलगाव नगर पालिकेत पाच कोटी ५७ लाख रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आरोपी असलेला मुख्याधिकारी बी.सी. गावित याला आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता नंदुरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा येथील राहत्या घरून त्याला ताब्यात घेण्यात आले.

याबाबत अधिक असे की, माजलगाव नगर परिषद विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत झालेल्या एक कोटी ६१ लाख तसेच चार कोटी १३ लाख रुपये असे एकूण पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या विविध कामात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात तत्कालीन नगराध्यक्ष, तीन मुख्याधिकारी, लेखापाल यांच्यासह सात जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास अष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लागारे हे करीत आहेत. यातील आरोपी असलेला तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी. गावित हे मागील १४ महिन्यापासून पोलिसांना चकमा देत फरारी होते.

मात्र, काही दिवसांपासून गावित हा आपल्या नंदूरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा या गावी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून आष्टी पोलीस हे मागील चार दिवसापासून नंदुरबार येथे तळ ठोकून होते. दरम्यान, मुख्याधिकारी गावित हा शुक्रवारी (दि. २६) मध्यरात्री एक वाजता कुंभारपाडा येथील त्यांच्या घरी आला. यावेळी पथकाने त्याला ताब्यात घेऊन आष्टी पोलिस ठाण्यात आणले. आष्टी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!