Share

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “गद्दारांना क्षमा नाही”

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने राज्यातील ठाकरे सरकार(Thackeray Govt) संकटात सापडले आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षाचा हा वाद अजूनही मिटताना दिसत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

केदार दिघे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. दिघे साहेबांच्या शिकवणीवर त्यांनी बोलू नये. दिघे साहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं. अखेपर्यंत ते शिवेसेनेसाठी झटले. मला वाटतं दिघे साहेबांचा आधार घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडू नये एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत, असं केदार दिघे यांनी सांगितलं.

तसेच पुढे ते म्हणाले कि, गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला, तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल, असं केदार दिघे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, एकूण ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महेंद्र थोरवे ,भरत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे ,शहाजी पाटील ,शंभूराज देसाई ,बालाजी कल्याणकर , ज्ञानराजे चौघुले , रमेश बोरणारे , तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख ,प्रकाश सुर्वे,किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल ,संजय रायुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे ,विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर अशी या आमदारांची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!