Share

Eknath Shinde : 40 आमदार माझ्यासोबत, आणखीन 10 आमदार सोबत येणार – एकनाथ शिंदे

Published On: 

गुवाहाटी : शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत काही वेळापूर्वी एक मोठी माहित समोर आलीये. आज पहाटे सूरतहून एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले होते. गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत. तसेच, सध्या शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आणखीन 10 आमदार इथे येणार असल्याचंही मोठा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.

तसेच काल मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. तसेच शिवसैनिकांनी कुठलही बंड केलं नाही. कोणत्‍याही पक्षात जाण्‍याचा निर्णय घेतला नाही, असंही एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!