Share

MNS : असली गुहाटीत नकली ‘वर्षा’ वर; ‘मनसे’नी शिवसेनेला डिवचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर पक्षविरोधात बंड पुकारला. ४० आमदारांसोबत ते आतापर्यत गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये होते. मात्र आता ते सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं गुवाहाटीला रवाना झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. या राजकीय घडामोडीवरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

“असली गुहाटीत नकली “वर्षा” वर आणि सेक्युलर गॅस वर”, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आहे. महेंद्र थोरवे ,भरत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे ,शहाजी पाटील ,शंभूराज देसाई ,बालाजी कल्याणकर , ज्ञानराजे चौघुले , रमेश बोरणारे , तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख ,प्रकाश सुर्वे,किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल ,संजय रायुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे ,विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा,  प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर अशी या आमदारांची नावे आहेत.

दरम्यान आज एकनाथ शिंदे मुंबईला येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज भाजपसोबत सत्तास्थापनेचा दावा एकनाथ शिंदे करतील का, अशा चर्चा होत आहेत. ठाकरे सरकारला जबर धक्का दिल्याचे आता राजकारणात म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!