मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उशिरा एक ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच गुजरातचे मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपले ट्वीट अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत गंभीर आरोप केले.
“आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh ) हे सुरत येथे भाजप तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली .मुंबईतील गुंड तेथे आहेत गुजरातच्या भूमीवर हिंसा?”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली.मुंबईतील गुंड तेथे
आहेत
गुजरातच्या भूमीवर हिंसा ? @AmitShah4BJP @CMOGuj— Sanjay Raut (@rautsanjay61) June 21, 2022
यावेळी संजय राऊतांनी म्हटले की, “अनेक आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केलीये. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं अपहरण करून सुरतला नेल्याची तक्रार केली आहे. आतापर्यंत ९ आमदारांच्या कुटुंबाने तक्रारी केल्या आहेत. असंच सुरु राहिलं तर मुंबई पोलिसांना कारवाई करावी लागेल,” तसेच एकनाथ शिंदे यांच्या मनातील गैरसमज आम्ही मुंबईत दूर करू मात्र गुजरातमध्ये जाणे शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde & Bacchu Kadu Update – एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर
- Anil Parab : शिवसेनेला दुसरा दणका? अनिल परब ९ तासांपासून ईडी ऑफिसमध्ये; अटकेची टांगती तलवार
- BJP vs Shiv sena : महाराष्ट्र भाजपकडून नव्हे तर केंद्रातून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न!
- Eknath Shinde Update : “तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो”, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद
- Kishori Pednekar : “बाळासाहेबांच्या प्रतिमेजवळचा लाईट हालतोय, त्यांना…” ; किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर


