मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांनी अनेक चित्रटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाची अनेकदा कौतुक केली जाते. मात्र त्यानंतर त्यांची नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा असायची. कारण ७५ वर्षीय कबीर बेदी यांनी ३० वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न केल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.
सध्या कबीर बेदी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नुकतंच त्यांनी त्यांची ऑटोबायॉग्रफी ‘आय मस्ट टेल: द इमोशनल जर्नी ऑफ एन अॅक्टर’ रिलीज केली आहे. यात त्यांनी पत्रकारितेतील करिअर, अभिनय आणि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यातील अनेक गोष्टी शेअर केले आहेत.
अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत त्याचे दु:ख व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मुलाची आत्महत्या आणि हॉलिवूडमधल्या अपमानामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. पण आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच मी यातून सावरू शकलो. आयुष्यातील अशा मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठीच नाही तर पुन्हा उभारी घेण्यासाठी ही शिकवण माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली’.
अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्यामुळे कबीर बेदी यांना खूप मोठा धक्का बसला होता. कबीर यांचा मुलगा सिद्धार्थला सीजनोफ्रेनिया नावाचा आजार होता. १९९७ साली वयाच्या २६ व्या वर्षी सिद्धार्थने आत्महत्या केली होती. या धक्क्यातून कबीर बेदी थोडे सावरले होते, मात्र हॉलिवूडपर्यंत त्यांचा प्रवास पोहोचल्यानंतर त्यांना दिवाळखोर ठरवण्यात आले होते. याबाबत ते या मुलाखतीत बोलत होत.


