Share

औरंगाबादेत ‘या’ चार नामांकित रुग्णालयात फायर सेफ्टी, मात्र हाताळण्याचे कौशल्यच नाही!

Published On: 

औरंगाबाद : भंडारा त्यानंतर विरार सारख्या घटनांनंतर औरंगाबाद मनपाला आता जाग आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि.२६) शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी अनेक रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टीची यंत्रणा असली तरी ती वापरायची कशी याची माहिती कोणालाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फायर सेफ्टीची यंत्रणा कशी वापरायची याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख आर. के. सुरे यांनी दिली.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिटसाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. हे पथक रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील ५६ रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे.

सोमवारपासून या तपासणीस अग्निशमन विभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांच्या नेतृत्वात सुरूवात करण्यात आली. शहरातील चार रुग्णालयांची पथकाने तपासणी केली. त्यात संबंधित रुग्णालयातील कर्मचार्‍यांना फायर सेफ्टीची यंत्रणा कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण नसल्याचे समोर आले. त्यावर संबंधित रुग्णालयांना प्रशिक्षणासाठी अग्निशमन विभागाला पत्र पाठवण्याची सूचना पथकाने केली. पत्र प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांतील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आर.के. सुरे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!