🕒 1 min read
पुणे : पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. अखेर रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले. फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, कँटॉनमेंट परिसरात वर्षभरात चौथ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे. गेल्या वर्षी कँटॉनमेंटच्या आयसीयूमध्ये आग लागली होती. महिन्याभरापूर्वीच चिल्ड्रन वॉर्डला आग लागली होती. १६ मार्चला कॅम्पमधीलच शिवाजी मार्केटला आग लागल्याची घटना घडली. २०१७ मध्ये मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनं फायर ऑडिट केलं. त्यात फॅशन स्ट्रीटचा उल्लेख धोकादायक असा करण्यात आला होता. इथली जवळपास सर्व दुकानं अनधिकृत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे सामना आमच्या हातातून निसटला : विराट कोहली
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- …म्हणून पांड्याला बॉलिंग नाकारली कोहलीने सांगितले कारण
- ‘आणखी किती फेकाल मोदी जी, मराठीत एक लाईन आहे… हद झाली राव’
- अवैध दारू विक्री निदर्शनास आणून द्या, एक वर्ष करापासून मुक्ती मिळावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
