Share

‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल

Published On: 

मुंबई : कोरोना काळात लॉकडाउन असल्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलेब्रिटी ला देखील कोरोना काळात आर्थिक संकटचा सामना करावा लागत आहे. ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचा रस्त्यावर ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

राजेश तैलंगने ट्विटर अकाऊंटवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रस्त्यावर रामलड्डू विकताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत राजेशने ‘लॉकडाउन खुले, करोना जाए तो फिर से धंधे पर लगें’ असे कॅप्शन दिले आहे.राजेशच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींना हा फोटो त्याच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटत आहे तर काहींना राजेशवर आर्थिक संकट आल्याचे वाटत आहे.

राजेशने ‘मिर्झापूर’ या अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केले आहे. यामधून त्याला लोकप्रियता मिळाली. यात त्याने गुड्डू भय्याचे वडील रमाकांत पंडित यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले, त्याला लोकप्रियता मिळाली. त्याने ‘ढाई अक्षर’ या मालिकेत काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!