औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या सिद्धार्थ उद्यानात सध्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली आहे. प्राणिसंग्रहालयात शांतता आणि शुकशुकाट असल्याने ही कामे वेळेवर पूर्ण होतील. प्राणिसंग्रहालयात रंगरंगोटीची कामे सुरू आहेत तसेच तुटलेले पिंजरे दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याने प्राणिसंग्रहालय मत्स्यालय सर्पालय आला नवे रूप प्राप्त होणार आहे.
सर्पालय, मत्स्यालयातील तुटलेले पिंजरे, फुटलेली पाईपलाईन, वाकलेल्या व गंजलेल्या संरक्षित जाळ्या, खोल्यांची झालेल्या दयनिय अवस्थेमुळे तातडीने प्राणिसंग्रहालय हलविण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्यांनी पाहणी केल्यानंतर केली होती. या सूचनांची दखल घेत पालिकेने सिध्दार्थ उद्यानातील सर्पालय, मत्स्यालय आणि प्राणिसंग्रहालयातील खोल्यांची रंगरंगोटी केली आहे. पाण्याची पाईपलाईन देखील बदलण्यात आली. त्यासोबतच संरक्षित जाळ्यास बदलण्यात आल्या. तिनही विभागाचे नुतनीकरण करण्यात आल्यामुळे सर्पालय, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय आता उजळून निघाले आहे.
मराठवाड्यातील एकमेव व महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात बिबट्या, पट्टेदार वाघ यासह विविध प्रकारचे ३७७ प्राणी आहेत. त्यासोबतच सर्पालय आणि मत्स्यालय देखील आहे. प्राणिसंग्रहालय पाण्यासाठी विविध शहरासह ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांच्या सहली, नागरिक व पर्यटक येतात. तीन वर्षापूर्वी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्यांनी प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी तातडीने प्राणिसंग्रहालयाची जागा बदलण्यात यावी, दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी सूचना केली होती.
त्यावर पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय व सर्पालयाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी मंजूर करुन ही कामे तातडीने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली. या संदर्भात उपअभियंता गोपिकिशन चांडक म्हणाले, मागील २५ वर्षापासून प्राणिसंग्रहालयाची दुरुस्ती व रंगरंगोटी झालेली नाही. सर्पालय, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे पिंजर्यांची व खोल्यांची दुरुस्ती करुन रंगरंगोटी करण्यात आली. प्रशासक पांडेय यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले, अशी माहिती उपअभियंता चांडक यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या एजंटाच्या पोलिस कोठडीत वाढ
- …अन् मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मेटेंनी केलं अजितदादांच कौतुक !
- ‘मोदी, ठाकरेंनी टिव्हीवर येण्यापूर्वी गरिबांचा विचार करावा’
- रेल्वेतून प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्याची हर्सुल कारागृहात रवानगी
- १२ आमदारांची यादी राजभवन सारख्या सुरक्षित जागेतून हरवतेच कशी ? – शिवसेना


