पुणे : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली होती. त्यावेळी राजभवनाच्या सचिवालयानं यासंदर्भातील यादी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता यासंदर्भातील यादी कशी गहाळ झाली ? असा सवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारला आहे.
यासंदर्भात आता शिवसेना, पुणे शहरचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. याबाबत शिवसेनेचे शहर समन्वयक आनंद दवे म्हणाले, ‘१२ आमदारांची यादी राजभवन सारख्या सुरक्षित जागेतून हरवतेच कशी ? हरवल्याचे कळल्यावर लगेच तक्रार का दाखल केली नाही ? काय चौकशी केली ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घ्यावे म्हणजे सत्य बाहेर येईल. या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांना भेटून चौकशी ची मागणी करणार आहोत. उद्या सकाळी ११.३० वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात ही भेट होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- लस घेण्यासाठी आता नोंदणीची गरज नाही ; वाचा नवे नियम
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना सर्वाधिक धोका नाही; एम्स संचालकांचा दावा
- मुख्यमंत्र्यांची फेरीवाल्यांसाठी ‘आर्थिक’ पॅकेजची घोषणा पूर्ण व्हायला लागला दिड महिना!
- पूर्ववैमनस्यातून तिघांनी केली विशाल उर्फ मड्याची हत्या
- ‘फडणवीसांनी आरक्षणासाठी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

