Share

अखेर नारायण राणेंचे भाजपमध्ये पुनर्वसन, सहा वाजता घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनानंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे अखेर पुनर्वसन झाले आहे. संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ते मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे नारायण राणेंना संधी मिळेल का? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा लपलेली नाही. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र, तसे झाले नाही. अखेर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्येही त्यांचा निभाव लागेल, या बाबत कायमच शंका उपस्थित केल्या जात होत्या.

भाजपमध्ये आल्यानंतर राणे यांना मोठी संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र, तसे झाले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाल्याने राणेंच्या मुलाला असलेली मंत्रिपदाची अपेक्षाही बारगळली होती. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होत असून संध्याकाही सहा वाजता शपथविधी होणार आहे. त्यामुळे अखेर भाजपमध्ये नारायण राणेंचे राजकीय पुनर्वसन झाले असे म्हणता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!