Share

प्रीतम मुंडेंची संधी हुकली, ‘भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय’

Published On: 

मुंबई : आज संध्याकाळी 6 वाजता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै, म्हणजेच आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होते. नारायण राणे, प्रीतम मुंडे, हिना गावित, कपिल पाटील आदी नेत्यांचा यात समावेश होता. राणेंसह प्रीतम मुंडे यांचे देखील नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मात्र, मुंडेंची संधी हुकली आहे. ज्या नेत्यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होऊ शकतो अशा सर्वांनी राजधानी दिल्ली गाठलीये. मात्र, प्रीतम मुंडे या मुंबईतच असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे. ‘गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नाही आहे,’ असं शेंडगे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!