Share

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत कृपाशंकर सिंह यांनी केला भाजपात प्रवेश

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून बड्या नेत्यांचे भाजपामध्ये पक्षांतर होण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या काही काळात ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हातात घेतल्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध केला होता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांचं स्वागत करत त्यांचा प्रवेश हा पक्षातील नसून एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झालेला प्रवेश असल्याचं म्हटलं.

उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. कृपाशंकर सिंह यांनी जम्मू-काशमीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याला पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

मात्र तेव्हापासून ते कुठल्याही पक्षाशी संलग्न नव्हते. दरम्यान,शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपने गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून याचाच एक भाग म्हणून सिंह यांच्या पक्ष प्रवेशाकडे पाहिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!