🕒 1 min read
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्याविरूध्द विद्यार्थीनीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून लगट करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला असून प्रकरणात संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंजा यांनी शनिवारी संजय शिंदे यांना अखेर निलंबित केले आहे. विद्यार्थी संघटनांचा वाढता दबाव पाहता हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
कामाच्या ठिकाणी महिला व विद्यार्थी यांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३ व विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम २ मे २०१६ नुसार अंतर्गत तक्रार समितीच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी २७ ऑगस्टला विद्यार्थीनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या दालनात गेली होती.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. परंतु, शिंदे यांनी चेहरा पाहण्यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले. त्यानंतर ३ सप्टेंबरला रात्री १० वाजून ३८ मिनिटांस व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून मॅसेज पाठविले. ‘डियर तु खुप सुंदर आहेस. तु पहिल्या नजरेत आवडलीस. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. असे संवाद साधले. त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर बोल ना, तुला राग आला का? असे प्रतिप्रश्न करून नंतर मॅसेज डिलीट केले. विद्यार्थी संघटनांकडून हे प्रकरण लावून धरण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने शिंदे यांना निलंबित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- ‘राज्यात लावलेली आणीबाणी अधिकृतपणे घोषित करून टाका’, चंद्रकांत पाटील ठाकरे सरकारवर संतापले
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- मुख्यमंत्रीजी, महिला-मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही – चित्रा वाघ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
