मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात जाणार आहेत. पण तत्पूर्वीच सोमय्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. यात कायदा-सुव्यवस्थेचे कारण देण्यात आले आहे. त्याचबरोबर आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं जात नसून पोलीस मला अटक करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व बेकायदेशीर असून कोल्हापूरमध्ये मला जिल्हाबंदी आहे, मात्र मला मुंबईत देखील पोलीस घराबाहेर पडू दिलं जात नाहीये, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
किरीट सोमय्या यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच निर्भीड होती. महाराष्ट्रात जी आणीबाणी राज्य सरकारने लावली आहे, ती आता अधिकृतपणे घोषित करून टाका. सोशल मिडियावर काही लिहायचे नाही, महिलांवर अत्याचार झाले की मोर्चे काढायचे नाही, त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 19, 2021
‘किरीट सोमय्या यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच निर्भीड होती. महाराष्ट्रात जी आणीबाणी राज्य सरकारने लावली आहे, ती आता अधिकृतपणे घोषित करून टाका. सोशल मिडियावर काही लिहायचे नाही, महिलांवर अत्याचार झाले की मोर्चे काढायचे नाही, त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा! अशी टीका पाटील यांनी केली.
‘किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचले आहे, हे जनतेला दिसत आहे. सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही. अब्रू नुकसानीचा दावा करताना २५ टक्के स्टॅबिलिटी म्हणजे जवळपास २५ कोटी भरावे लागतील. आता एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी तुम्ही व्हाईट मनी कुठून आणणार? हाच व्हाईट मनी जमा करण्यासाठी हे लोक गावोगावी हिंडून वर्गणी गोळा करत आहेत.’
या देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून १० लाख लोकांना तुरुंगात टाकले. मात्र भारत हा लोकशाही खऱ्या अर्थाने रुजलेला देश आहे. महात्मा गांधी जी यांच्या नेतृत्वात इथे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले गेले. आमचा आवाज यांना आता दाबता येणार नाही.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 19, 2021
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारच या सर्व तपास यंत्रणा कार्य करत आहेत, मात्र या सरकारला घटनादेखील मान्य नाही. केंद्राने सत्तेचा दुरुपयोग केला, अशी एकही घटना घडली नाही आणि तसे कधी न्यायालयानेही म्हटले नाही. अनिल देशमुख यांचा दावा चालवण्यासाठीही न्यायालय नकार देत आहे. या देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून १० लाख लोकांना तुरुंगात टाकले. मात्र, भारत हा लोकशाही खऱ्या अर्थाने रुजलेला देश आहे. महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वात इथे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले गेले. आमचा आवाज यांना आता दाबता येणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री गायब, मात्र भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या सोमय्यांवर कारवाई’
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- किरीट सोमय्या स्थानबद्ध ? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- खळबळजनक! मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश; सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

