🕒 1 min read
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं जात नसून पोलीस मला अटक करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व बेकायदेशीर असून कोल्हापूरमध्ये मला जिल्हाबंदी आहे, मात्र मला मुंबईत देखील पोलीस घराबाहेर पडू दिलं जात नाहीये, असं किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. सोमय्यांवर होत असलेली ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हणत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
वाह रे तुमचा पुरोगामीपणा…
मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी @KiritSomaiya जीं च्या अटकेचे आदेश….@CMOMaharashtra महोदय जी महिला मुलींवर अत्याचार करणार्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही….
तुमच्या या ॲक्शन ने खात्री झाली कोल्हापूरमें दाल जरूर काली है…
किरीटजी हम आपके साथ है ???? https://t.co/RcYsNmklOy
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 19, 2021
याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील भाष्य करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘वाह रे तुमचा पुरोगामीपणा…मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी किरीट सोमय्या यांच्या अटकेचे आदेश. मुख्यमंत्री महोदय जी महिला मुलींवर अत्याचार करणार्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही. तुमच्या या ॲक्शनने खात्री झाली कोल्हापूरमें दाल जरूर काली है…किरीटजी हम आपके साथ है’ असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री गायब, मात्र भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या सोमय्यांवर कारवाई’
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- किरीट सोमय्या स्थानबद्ध ? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- खळबळजनक! मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश; सोमय्यांचा गंभीर आरोप
- ‘उद्धव ठाकरेंनी मला धमक्या देण्यापेक्षा मुश्रीफ, परब, सरनाईक यांना अटक केली पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
