पुणे भाजपचे माजी आमदार अनिल बोन्डे यांच्या विरोधात हडपसर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनिल घुले यांनी बोंडेंच्या विरोधात ही तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलकांकडून जो हल्ला करण्यात आला होता, याच घटनेवरून अनिल बोंडे यांनी अप्रत्यक्षपणे धमकी दिली होती व शरद पवार यांना राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घेण्याचा सल्ला दिला होता. जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य ही केले होते.
बोंडे म्हणाले होते, “गुणरत्न सदावर्ते आणि १०९ एसटी कामगारांना बळीचा बकरा बनवला जात आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला सहानुभूती निलावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच घडवून आणला असावा. या हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी.”
संजय राऊत यांना ही त्यांनी आव्हान दिले. “गुणरत्न सदावर्ते यांचा भाजपशी संबंध आहेत” हे संजय राऊत यांनी सिद्ध करून दाखवावे,” असे अनिल बोंडे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
“एसटी कामगारांना सांगत होतो…ऐकलं नाही” – अजित पवार
“त्या” कीर्तनकारांचे नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी – तृप्ती देसाई
“…यामागे मोठे षडयंत्र”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया
मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा
शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
