Share

घरपोच दारूची विक्री न करणाऱ्या चौघाविरूध्द गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात घरपोच दारू विक्री करावी असे आदेश असतांना घरपोच दारू विक्री न करणा-याविरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागात घरपोच दारू विक्री न करता हॉटेलमध्ये विक्री करणा-या चार जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, निलेश अंबादास वाघलबाळे (वय ५०, रा.चिकलठाणा) हे २२ एप्रिल रोजी चिकलठाणा परिसरातील हॉटेल आशादिप येथे दारूची विक्री करतांना मिळून आले. दुस-या घटनेत, कुंडलिक नारायण गायकवाड (वय ५७, रा.चिकलठाणा) हे नारेगाव येथे देशी दारूच्या दुकानातून देशी दारूची विक्री करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळून आले.

तिस-या घटनेत, कृष्णा छगन वनारसे (वय २७, रा.सुदर्शन नगर, हडको एन-११) हे २४ एप्रिल रोजी सिडको परिसरातील हॉटेल सुर्या येथे दारूची विक्री करतांना मिळून आले. चौथ्या घटनेत, प्रशांत अशोक जैस्वाल (वय २७, रा.गेवराई-पायगा, ता.फुलंब्री) हे सेंट्रलनाका परिसरातील हॉटेल वॅâप्टन येथे हॉटेलमध्ये ग्राहकांना दारू पिण्यास परवानगी देवून दारू देतांना मिळून आले. घरपोच दारूची विक्री न करणा-याविरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय रोकडे, उपनिरीक्षक गणेश पवार, आशिष महिंद्रकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनुक्रमे एमआयडीसी सिडको आणि सिडको पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!