टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच एकमेकांवर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. शेलार यांनी ‘नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘नगर तालुक्यात ६६ छावण्या आणि ७० गावांत टँकरच्या १५० खेपा टाकल्या जात होत्या. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दमदाटी करून सर्व छावण्या बंद आणि टँकरच्या ६६ खेपा कमी केल्या. तसेच नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून जनावरे आणि माणसांना पाणी हवे आहे. टँकरच्या खेपा वाढायला हव्या होत्या, तर त्या कमी केल्या. दुष्काळाबाबत सरकार आणि प्रशासन असंवेदनशील आहेत अशी टीका शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सध्या पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी नागरिक करत आहेत.
- विधानसभेला मला शिवेंद्रराजेंचे काम करावं लागेल
- आभाळाचा खांब – एकनाथ शिंदे
- उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
- धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
