Share

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील गुणोरे या गावात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील बढे ढवळे वस्तीवर राहणारे बाबाजी विठ्ठल बढे (४०), कविता बाबाजी बढे (३५), आदित्य बाबाजी बढे (१५) आणि धनंजय बाबाजी बढे (१३) या एकाच कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्त्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही . घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे दाखल झाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मात्र एकाच कुटुंबातील चार जणांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबाजी विठ्ठल बढे हे व्यवसायाने शेतकरी होते.

दरम्यान जनावरांच्या हंबरण्याने घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असचताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे हंबरत होते. ही जनावर का हंबरत आहेत म्हणून ग्रामस्थांनी पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. नेहमी सकाळी लवकर उठणारे बढे आज का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!