मुंबई – पेट्रोल दरवाढीच्या विरोधातील आंदोलनाच्या नौटंकी दरम्यान एकाच बैलगाडीवर 20 पेक्षा जास्त लोक बसून बैलांसोबत क्रूर वागणूक देत त्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात काँग्रसच्या आंदोलनात कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करण्यात आली, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे असे कोणतेही नियम पाळण्यात आले नव्हते. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अशा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच या आंदोलनाच्या वेळी अत्यंत ज्वलनशील असलेल्या गॅस सिलेंडरचा सुद्धा वापर करण्यात आला होता.
हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता भाई जगताप यांच्यासह सर्व आंदोलकांवर प्राणी क्रूरता कायद्याच्या कलम 11 व भारतीय दंड संहिता कलम 428 नुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
तसेच, भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनावरून सभागृहात गरळ ओकणाऱ्या पालकमंत्री असलम शेख यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना समज देत अशा प्रकारच्या आंदोलनाची नोटंकी बंद करण्यास सांगावे असा खोचक सल्ला सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या :
- बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम


