औरंगाबाद : शिवराज नारीयलवाले मारहाण प्रकरणातील अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करुन गुन्हे दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जन प्रसन्ना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही तर युवा मोर्चाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
जालना येथील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारियवाले यांना पोलिसांनी अमानुष्य मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हाययरल झाला आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप युवा मोर्चाने आंदोलनाची हाक दिली आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शनिवारी जालना येथे नारियवाले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांयकाळी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जन प्रसन्ना यांची भेट घेत याप्रकरणी चर्चा केली. मारहाण प्रकरणातील एका उप निरीक्षकासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. परंतू अद्यापही मारहाण करताना दिसणारे पोलिस निरीक्षक महाजन, व मारहाणीचे सुत्रधार डीवाएसपी सुधीर खिरडकर याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करुन गुन्हे दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. दोन दिवसात कारवाईचे आश्वासन महानिरीक्षकांनी दिले आहे. लवकर कारवाई झाली नाही तर युवा मोर्चाचे काऱ्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला. महिनाभरानंतर मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी करत या अमानुष्य मारहाणीचा निषेध केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

