मुंबई : आज मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. याचे कारण होते अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.
सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतल्यानंतर, दोन्ही पक्षात प्रचंड धुमश्चक्री उडाली. शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली.
मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली. दरम्यान काही वेळापूर्वी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये बसवले.
दरम्यान, मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारलं असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे सध्या सेना भवनासमोर हजारो पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कधी होणार महाराष्ट्रात CET परीक्षा ? उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा


