मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर ठाकरे-कोश्यारी वादात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला ट्वीट करून लगावला आहे.
अमृता फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दारुच्या दुकानांना परवानगी देण्याबाबत अमृता फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट मी टीव्हीवर ऐकलं आणि ते धक्कादायक आहे. तुम्ही देवालय सुरु करत नाही आणि मदिरालय सुरु करता, असं ते म्हणाले. कारण मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंनी आहे आणि दारुच्या दुकानांमध्ये जाणारे खूप कमी आहेत. तिथे रांगा लावून लोक जातात,’ अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही, सरकारवर उघड नाराजी
- ‘आनंदीबाईनी राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच बेताल बोलण्याला लगाम घालावा’
- विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी काँग्रेसकडून सत्यजित तांबेंच नावं चर्चेत!
- ‘छोटे नवाब’ तैमूरचा मनोरंजक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- कोरोनाच्या भितीने नगरमधील तिन्ही मंत्री घरात बसून- शिवाजी कर्डिले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

