Share

शरद पवार यांच्या धोरणामुळेच खत दरवाढ झाली होती ; भाजपचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटात आधीच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना केंद्र सरकारने खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती. यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत अर्ध्याने कमी केली आहे.

देशात खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे विरोधकांनी केंद्र सरकार आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका सुरु केली होती. आता या आरोपांना त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जातय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी खतांच्या किमती कमी करण्याबाबत केंद्रीय मंत्री सदानंद गौरा यांना पत्र लिहिल होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खत दरवाढीला प्रत्यक्षात शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत असल्याचा पलटवार केला आहे.

आता ‘खत दरवाढी विरोधात पत्र लिहीणारे शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत आहे. तत्कालिन कृषिमंत्री असणाऱ्या शरद पवार व यूपीए सरकार यांच्या निर्णयामुळे खत दरवाढीला सामारे जावे लागले. युपीए सरकारच्या काळात ज्यात शरद पवार कृषिमंत्री होते. त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी 1 एप्रिल 2010 पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले’, असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झालेली पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!