Share

जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांचे औरंगाबादेत ‘धाडसत्र’, व्यापारी वर्गात खळबळ!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा ताफा अचानक दुकानासमोर येऊन थांबला. अन दुकानातील ग्राहक आणि दुकानदारांचा एकच गोंधळ उडाला. एकामागोमाग एक गाड्या, अधिकारी, कर्मचारी यांना पाहून सुरक्षारक्षकांची भंबेरी उडाली आणि लपूनछपून सुरु असलेला खरेदी-विक्रीचा खेळ एकदाचा थांबला. अशाप्रकारे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त दोघांनी मिळून शुक्रवारी (दि.२१) दुपारपर्यंत २५ दुकानांना सिल ठोकले. त्यांच्या या कारवाईने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी सूचना मिळाल्यानंतर दुकानदारी बंद करत कुलुप ठोकणे पसंत केले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र काल अचानक पुन्हा एकदा जिल्ह्यात पाचशेच्या वर रुग्णसंख्या गेली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी तातडीची बैठक बोलावत आजच्या प्लॅनविषयी चर्चा केली. सकाळी साडे नऊ पर्यंत सर्वांना गुप्तता राखण्याच्या सूचना देऊन कारवाईला सुरुवात झाली. साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त निखील गुप्ता स्वतः कारवाईसाठी थेट शहागंज, जाफर गेट, किराडपुरा या भागातील उघड्या दुकानांना जागेवर सिल ठोकण्यात आले. दरम्यान महसूलचे एक पथक वाळूज भागात ही कारवाई करत होते. दुपारपर्यंत वाळूजमधील सहा दुकानांना सील ठोकले होते.

जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त धाड टाकण्यात अशी कुणकुण लागताच एका दुकानदाराने पटापट सेंटर बंद करीत धूम ठोकली. सुरक्षारक्षकांना फोन वर संदेश काही सांगू नका असे आदेशही दिले. जिल्हाधिकारी पोलिस आयुक्तांनी या दुकानावर धाड टाकली तेव्हा २० पेक्षा जास्त ग्राहक आत मध्ये अडकलेली होती. मात्र दुकान बंद करून मालक पसार झालेला होता.

कितीदा विनंत्या  करायच्या ? : वारंवार जर असे कृत्य होत असे सांगून ही दुकाने सुरू ठेवली जात असतील तर आम्ही गुन्हे दाखल करूच. कितीदा विनंत्या करायच्या, पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो कि नियमांचे पालन करा, कृपया आपल्या शहरात कोरोना केसेस कमी होत असतांना गाफील राहून चालणार नाही. अशी विनंती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी समस्त व्यापारी वर्गाला केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!