मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात काेणतीही व्यक्ती उपाशी राहू नये. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकराने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे गरजूंना एक वेळचे मोफत जेवण मिळू लागले.
शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्याची कालमर्यादा वाढविण्यात आली. आज शुक्रवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी माेफत देण्याची कालमर्यादा वाढवली. आता १४ जूनर्यंत शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे.
४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला मोफत जेवनाचा लाभ
राज्यात दि.१५ एप्रिलपासून ते दि. २० मे पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. तर शिवभोजन थाळीची योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे राज्यभरात वितरण करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी पंतप्रधान आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेसचा असता तर..’
- अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध
- खाकीला काळीमा! ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी डीवायएसपी खिरडकरने घेतले दोन लाख
- खतांची दरवाढ मागे; ‘केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा’, प्रीतम मुंडेंकडून स्वागत
- ‘..त्यामुळेच माध्यमांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पाठलाग सुरू’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप


