Share

 कोरोनावरील आयुर्वेदीक औषध घेण्यासाठी नियमांचे उल्लंघन करत जमली तब्बल 10 हजार लोकं

Published On: 

🕒 1 min read

कृष्णापट्टणम – देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून नागरिक कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून विविध उपाय करताना देखील दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी काही अघोरी पूजादेखील होताना पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी विविध औषधे ही कोरोनावर गुणकारी असल्याचं सांगत वाटप देखील केले जात आहे.

दरम्यान,आंध्र प्रदेशातील कृष्णापट्टणम भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विविध वनौषधींचे मिश्रण करून हे कोरोनावरील आयुर्वेदीक औषध असल्याचं सांगून एक औधध लोकांना मोफत दिलं जात आहे. हे औषध बोगिनी आनंदैया यांनी तयार केले आहे. हे औषध कोरोनावर गुणकारी असल्याचा लोकांचा समज झाल्याने ते मिळविण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केल्याचे समोर आले आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांना अक्षरशः पायदळी तुडवण्यात आले.

जवळपास महिनाभर हे औषध वाटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने औषधाच्या वाटपावर बंदी घातली होती. मात्र वाएसआरसीपी पक्षाच्या काकाणी गोवर्धन रेड्डी या आमदाराने या औषधाच्या वाटपाला पुन्हा सुरुवात केली. लोकं या औषधासाठी अधीर झाली होती, ज्यामुळे त्याच्या वाटपाला पुन्हा सुरुवात केल्याचं आमदारांनी सांगितले.

औषध वाटप बंद केल्याने लोकं अस्वस्थ व्हायला लागली असल्याने एक दिवसासाठी वाटपाला परवानगी मिळाली असं त्यांनी सांगितलं आहे. रेड्डी यांनी सांगितलं की इतर राज्यातूनही लोकं या औषधासाठी यायला लागली असून शुक्रवारी जवळपास 10 हजार लोकं हे औषध नेण्यासाठी आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!