औरंगाबाद : दिवसाढवळ्या व्यापा-याच्या घरात घुसून चोरट्यांनी गळ्यावर चाकु लावून ‘दस लाख रख, तेरे को क्राइम क्या है बताता’ असे म्हणत सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कन्नड शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मागील भागात असलेल्या खांडसरी परिसरात वर्धमान जैन हे कुटुंबासह राहतात. जैन यांच्या तळघरात बिल्डींग मटेरीअलचे दुकान आहे. तर वरच्या मजल्यावर ऑफिस आणि घर आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्यावरील ऑफीसमध्ये काही अज्ञात शिरले व त्यांनी जयकुमार जैन आणि त्यांच्या वडिलांना चाकुचा धाक दाखवला. एका अज्ञाताने जैन यांचा मुलगा दिव्यांश याच्या गळ्याला चाकु लावला असता आवाज ऐकुन जैन यांची आई आणि पत्नी या दिव्यांशला पकडण्यासाठी गेल्या असता अज्ञात व्यक्तीने जैन यांच्या आईला चाकु दाखवत लोटले. यात जैन यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची अंदाजे दोन तोळ्यांची ८० हजार रुपये किंमतीची चेन या चोरट्यांनी हिसकावून घेतली.
आरडा ओरड केल्यानंतर आजू बाजूचे लोकं जमा झाले. त्यानंतर अज्ञात व्यक्ती खाली पळून जात असताना त्यांनी जैन यांच्या वडिलांच्या हातातून ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि एक ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल पळवला. असे एकुण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती जैन यांनी तक्रारीत दिली आहे. या प्रकरणी आरोपी वसीम हकोमोदीन खान (रा.हुसैन कॉलनी, गल्ली नं.२ औरंगाबाद), फयाज बशीर पठाण (रा.बाजीपुरा,गल्ली नं.२० औरंगाबाद) यांच्यासह इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

