औरंगाबाद : दैनंदिन जीवनात घराबाहेर पडून काम करणा-यांची संख्या अधिक आहे. मात्र कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर घोषित लॉकाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरातच राहिल्यामुळे अनेकांना तणावाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी मानसोपचार तज्ञ मंडळींनी उपाय सुचविले असून घरातच राहून विविध गोष्टींमध्ये मन रमविल्यास मानसिक तणावातून दिलासा मिळू शकेल असे मत तज्ञ व्यक्त करीत आहेत. लहान मूल, तरुण, वृद्ध किंवा महिला या सर्वांवर या लॉकडाऊनचा परिणाम घडून येत असल्याचे चित्र आहे.
मुलं शाळेत, माणसं ऑफिस किंवा व्यवसायात, वृद्धमंडळी समवयस्कांसोबत, तर महिला देखील दैनंदिन घरकामात व्यस्त असतात. मात्र कोरोनाच्या घोषित लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच कोंडून पडले आहेत. यामुळे अनेकांच्या मानसिक स्थितीत चलबिचल सुरु झाली आहे. यात सर्वाधिक समस्या वृद्धांच्या असून नागरिकांत कोरोनाची धास्ती कायम आहे. घरात राहून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातुन नागरिक आपल्या मनात एक विशिष्ट चित्र तयार करत असतात. यातून मनाची घालमेल सुरु होते. मनातील होणा-या बदलाला वैद्यकीय भाषेत डिस्ट्रेस असे म्हंटले जाते. यात सर्वाधिक तक्रारी ‘मला तर कोरोना होणार नाही ना?’ ही भिती असते. यावर अनेकजण मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही घेऊ लागले आहेत. या सर्वांच्या समस्या व अडचणी वेगवेगळ्या आहेत, हे पण दिसून येत आहे.
‘मुलांचा स्क्रीनटाइम कमी करावा’ मुलं स्वच्छंदी आयुष्य जगणारे असतात. अशावेळी त्यांना एकाच जागेवर थांबवून ठेवले तर त्याचा विपरीत परिणाम घडतो. अशीच स्थिती सध्या मुलांची झाली आहे. मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यांचे रोजचे रुटीन असंतुलित झाले आहे. रात्रीचे जागरण वाढले आहे. सतत टीव्ही आणि मोबाइलवर वेळ घालवला जातोय. मित्रमैत्रिणींशी दुरावा झालाय. सारखे घरी राहून मुलांच्या मेंदूमध्ये एंडोसीन नावाचा हॉर्मोन तयार होतो. त्यामुळे त्यांच्यात चिडचिड आणि तणाव (डिस्ट्रेस) वाढतोय. यासाठी मुलांचा स्क्रीनटाइम कमी करून इनडोअर गेम्स शिकवावे. सूर्यनमस्कार, व्यायाम शिकवावा. कलाकुसर किंवा बौद्धिक क्षमतावाढीचे खेळ शिकवावे.असे बाल रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

