हिंगोली: हिंगोली येथे राज्यातील पहिले महिला कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना उपचारसाठी ठेवले जात आहे. या केअर सेंटरमध्ये महिला वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी आठ ते नऊ महिला रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंश यांनी या कोविड केअर सेंटरला भेट दिली.
‘ताई घाबरू नका, रुग्णांची काळजी घेण्यास प्रशासन सज्ज आहे. कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि आपण लवकरच बरे होऊन घरी जाणारच,’ असा दिलासा आणि विश्वास हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंश यांनी रविवारी महिला कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना भेट देऊन दिला. महिलांसाठी विशेष कोविड केअर सेंटर सुरु करण्यामागचा उद्देश असा की, महिलांमध्ये आपापसात संवाद होऊन आजाराच्या मानसिकतेतून त्या बाहेर पडतील या उद्देशाने हे सुरु करण्यात आले आहे. हे असलं तरी येथील महिला रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या केअर सेंटरला भेट देऊन त्यांना दिलासा दिला आणि या आजारातून लवकरात लवकर बरे होऊन बाहेर पडू असा विश्वास देखील या वेळी त्यांनी येथील महिला रुग्णांना दिला. काळजी करण्याची गरज नाही तसेच प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील असे अश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात नवीन रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असली तरी तातडीने औषधोपचार करून रुग्णांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये तसेच बाहेर जाताना मास्क वापरावा आणि फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, अशी सूचना रुचेश जयवंश यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका
- ‘…तर सत्य परिस्थितीची माहिती राज्यपालांनी राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवलीच पाहिजे’
- वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोरोनाची लागण
- परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता, पोलीस अधिकाऱ्याने केले गंभीर आरोप
- एटीएसच्या करेक्ट कार्यक्रमावर शरद पवार खुश, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

