मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणात नाट्यमय घडामोडी आणि बैठकांचं सत्र सुरू असताना आता परमबीर सिंग यांच्याविरोधात पोलिस निरीक्षकाने केलेल्या तक्रारीचे पत्र समोर आले आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी या पत्रात केली आहे. निलंबन न करण्यासाठी ५० लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कारवाई केली होती. अनुप डांगे यांनी २ फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. असा आरोप करणारे पत्र व्हायरल झाले आहे.
23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि निर्माता भरत शहाचा नातू यश याने पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण केली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली आणि यश आणि त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
याप्रकरणी यश आणि एका मैत्रीणीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाशी संबंध नसलेल्या जितू नवलानी नाव आरोपी म्हणून घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीचा याप्रकरणाशी काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यावेळी डांगे यांनी त्यावेळी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. त्यात डर्टी बन्स पबचे मालक जितू नवलानी याने परमबीर सिंग यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी पत्रात केला होता.
दरम्यान,सिंग यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केलय, त्याने जितेंद्र नवलानी, भरत शाह, राजीव भरत शाह आणि अन्य संबंधितांबाबत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परमबीर यांचे त्यांच्यासोबत असलेल्या कनेक्शनची तसेच दाखल गुन्ह्यांबाबतही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
परमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, आपली विभागीय चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. पाठोपाठ निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? संजय राऊत कडाडले
- पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- ‘…परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी’ ; गौतम गंभीर
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

