Share

‘…तर सत्य परिस्थितीची माहिती राज्यपालांनी राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवलीच पाहिजे’

Published On: 

मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी केल्या नंतर राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाजप नेते सुधीर मनुगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आमची मागणी नाही. मात्र राज्यपालांनी सध्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्यपाल महोदयांनी राज्यातल्या सत्य परिस्थितीवर आधारित घटनेत नमून केलेल्या तरतुदींच्या आधारे एक अहवाल राष्ट्रपतींना सादर करावा. मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांनीही सत्य कथन असलेला अहवाल लिहावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार केली.

‘गृहमंत्री पोलिसांना 100 कोटींची खंडणी वसूल करायला सांगतात यांची उच्चस्तरिय चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपाच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांनी केली.राज्य सरकार घटनेनुसार कृती करण्यास असमर्थ असेल. तर सत्य माहिती राज्यपालांनी राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आम्ही राज्यपालांना परवा भेटायला जाणार आहोत. राज्यपाल महोदयांनी राज्यातील घडामोडींचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवावा अशी विनंती आम्ही करणार आहोत, असं यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!