नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवंनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या ते चांगलेच चर्चिले जात आहे. मात्र आता रावत यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.
तीरथ सिंह रावत यांनी ट्विट मध्ये सांगितले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी ठीक असून मला कोणताही त्रास होत नाही. डॉक्टरांच्या निगराणीखाली मी स्वतःला आयसोलेट केले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील आपली तपासणी करून घ्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी रिप्ड जीन्स बाबत केलेल्या वक्त्यव्यावरून रावत यांच्यावर टीका झाली होती. मात्र तरीदेखील ते आपल्या वक्त्यव्यावर ठाम होते. त्यानंतर नैनीताल जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान तीरथ सिंह रावत यांनी ‘करोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?’ असा प्रश्न उपस्थितांना विचारला होते. यावेळी अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केले असल्याचे विधान देखील तीरथ सिंह रावत यांनी केले आहे. त्यामुळे या विधानांमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- एटीएसच्या करेक्ट कार्यक्रमावर शरद पवार खुश, म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

