मुंबई: राज्यात नळावरची भांडणं सुरू आहेत. हे पाहिल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये राज ठाकरेंविषयी अशी भावना निर्माण झाली आहे की जे काही करायचं असेल या राज्यात तर ते राज ठाकरेच करू शकतात, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुढीपाडव्याच्या मेळाव्याला देखील मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज ठाकरे अनेक विषयांवर बोलणार असल्याचं देखील नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.
राजकारणात युती विषयी विचारले असता नांदगावकर म्हणाले की, आत्तापर्यंत मनसेचा एकटा जीव सदाशिवच चालू आहे. ज्यांना सोबत यायचं ते येतील ज्यांना नाही यायचं ते नाही येणार. तसेच युतीच्या चर्चा होतच राहतात, असंही बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
भिवंडीत “काश्मिर फाईल्स” चित्रपट बंद केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक
“असंसदीय शब्द बिनदिक्कतपणे वापरणाऱ्या संपादकांची…”, भातखळकरांचा हल्लाबोल
IND vs SL: आकाश चोप्राने केले ऋषभ पंतचे कौतुक म्हणाला “टेस्टमध्ये त्याने…”
“पराभवासाठी गांधी कुटुंब जबाबदार नाही”, मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया
“आम्ही जेलला घाबरणारे नाही, ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात घ्यावं”, फडणवीसांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

