🕒 1 min read
मुंबई: जसप्रीत बुमराहने बेंगळुरू येथील डे-नाईट कसोटीत त्याच्या विकेट्सची संख्या १२१ वर नेली आहे. त्याच्या स्पेलने लंकन खेळाडूंना धक्का दिला आणि ते पहिल्या डावात केवळ १०९ धावांवर बाद झाले. बुमराहच्या खेळीचे सगळीकडून कौतुक होत आहे. माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी सुद्धा बुमराहची प्रशंसा केली आहे.
जसप्रीत बुमराहची (Jaspreet bumrah) तोंड भरून प्रशंसा करताना सुनील गावस्कर (sunil gavaskar) म्हणाले “इतके कौशल्य, इतकी क्षमता, स्वतःवर इतका विश्वास आणि त्याला नेहमी कालपेक्षा चांगले व्हायचे असते. आणि त्यामुळेच तो इतका यशस्वी झाला आहे. प्रत्येक सामन्यात तो अधिक चांगली कामगिरी करतो. प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीत असे घडते, त्याच्यासाठी विचित्र काळ असू शकतो, परंतु तो असा गोलंदाज असेल ज्याचा सामना कोणत्याही विरोधी फलंदाजाला करायचा नाही.”
बुमराह सध्या चालू असलेल्या WTC मध्ये विकेट घेणार्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या नावावर तीन फायफर्ससह आतापर्यंत ३८ विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर त्याचा मागच्या सामन्यातला पहिलाच फायफर ठरला. सुनील गावस्करांनी त्याची नव्या चेंडूसोबत होणाऱ्या कामगिरी बाबतही कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भिवंडीत “काश्मिर फाईल्स” चित्रपट बंद केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक
- “असंसदीय शब्द बिनदिक्कतपणे वापरणाऱ्या संपादकांची…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- IND vs SL: आकाश चोप्राने केले ऋषभ पंतचे कौतुक म्हणाला “टेस्टमध्ये त्याने…”
- “आम्ही जेलला घाबरणारे नाही, ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात घ्यावं”, फडणवीसांचा इशारा
- “तपास यंत्रणांच्या टार्गेटवर शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते” – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
