Share

Russia-Ukraine war : मुलीला निरोप देताना वडिलांना अश्रू अनावर; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बाप-लेकीचा व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून जागतिक दबाव असूनही दोन्ही देशांनी युद्धाची भूमिका मागे घेतलेली नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्याने राजधानी कीवसह प्रमुख शहरे लष्करी हल्ल्यांखाली आली आहेत. या युद्धाचे अनेक व्हिडिओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्रच भीतीदायक आणि चिंतादायक वातावरण निर्माण झाले आहे. अशा परस्थितीत एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एक वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत. या वेळी वडील आणि मुलीचे डोळे पाणावले आहेत. (Father sheds tears while saying goodbye to daughter) हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट केला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे की ‘युक्रेनियन बाप आपल्या कुटुंबाला अलविदा म्हणतो, तर तो रशियनांशी लढण्यासाठी मागे राहतो.’

https://twitter.com/Awhadspeaks/status/1497072994879172610

दरम्यान रशिया-युक्रेन युद्धाला सर्व जगभरातून विरोध केला जात आहे. युद्ध व्हायलाच नको, अशी भूमिका प्रत्येक देशांनी घेतली आहे. तर रशिया आणि युक्रेनने मात्र युद्धाची भूमिका सोडलेली नाहीये. दरम्यान भारत युक्रेनमधून सुमारे १६००० लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली असून परराष्ट्र मंत्रालय स्थलांतरासाठी जमीन मार्गांची यादी तयार करत आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी “पुतिन हे आक्रमक आहेत. पुतिन यांनी हे युद्ध निवडले. आणि आता त्याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या देशाला भोगावे लागतील.” असे म्हटले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यातही रशिया-युक्रेन युद्ध संदर्भात चर्चा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!