Share

“उद्या ते महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकतील”, संजय राऊतांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगावमधील निवासस्थानी आज(२५ फेब्रु.)पहाटेच ईडीने धाड टाकली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीपूर्वीच होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा उद्या महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकतील, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की, ‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणा महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकू शकतात. महापालिकेतील अनेक शिपाई शर्टाच्या खिशावर धनुष्यबाणाचं चिन्ह लावतात. त्यामुळे उद्या त्यांच्या घरावरही धाडी पडू शकतात’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘केंद्रीय तपास यंत्रणांकडून खोटे गुन्हे दाखल केले जात असून २०२४ पर्यंत महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि पंजाबला अशा कारवाया सहन कराव्या लागतील’, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!