🕒 1 min read
मुंबई: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून जागतिक दबाव असूनही दोन्ही देशांनी युद्धाची भूमिका मागे घेतलेली नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्याने राजधानी कीवसह प्रमुख शहरे लष्करी हल्ल्यांखाली आली आहेत.
या संदर्भात भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनमधून मुलांना आणण्यासाठी मार्ग काढावा लागेल. परराष्ट्र मंत्री या संदर्भात काम करत आहेत. माझ्या भागातील काही लोक अडकले असतील तर मी विशेष लक्ष घालेल. तसेच एका बाजूला अमेरिका आणि एका बाजूला रशिया यामध्ये भारत सरकारने राजकीय पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतला जावा. भारताची यामध्ये इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती झाली आहे, असं चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“उद्या ते महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकतील”, संजय राऊतांचा खोचक टोला
“…ते प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं”, रोहित पवारांचे ट्विट चर्चेत


