🕒 1 min read
नवी दिल्ली : प्रेस वॉचडॉग- रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीज (RSF), ने जगातील विविध देशांच्या 37 नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या नेत्यांवर त्या-त्या देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नाव आहे.
मोदींव्यतिरिक्त, यावर्षीच्या यादीमध्ये उत्तर कोरियाचे किम जोंग-उन, ब्राझीलचे अध्यक्ष जैयर बोल्सनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा समावेश आहे. सौदी अरेबियाचा मुकुट राजकुमार मोहम्मद बिन सलमान आणि हंगेरियनचे पंतप्रधान विक्टर ऑरबॅन हे या यादीत समावेश आहे. रिपोर्टर्स विदाउट बाउंड्रीजने या यादीत पाकिस्तानविषयी बोलताना म्हटलं आहे की, इम्रान खान यांच्या राजवटीत वृत्तपत्रांच्या छपाईत अडथळे आणले जात आहेत. माध्यम संस्थांना धमकावले जात आहे. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यापासून या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
या यादीत एका महिला नेत्याचेही नाव आहे. हॉन्गकॉन्गच्या अॅडमिनिस्ट्रेटिव चीफ कॅरी लॅम यांनी देशात 2018 मध्ये आणलेल्या डिजिटल सिक्योरिटी कायद्याला अत्याचारी म्हटले आहे. या कायद्यामुळे 70 पेक्षा जास्त पत्रकार आणि ब्लॉगर्सवर खटला दाखल करण्यात आल्याचे RSF ने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंडे, महाजन असते तर त्यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या थोबाडीत मारली असती – पवार
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- दलित,मुस्लिम,मराठा आणि ओबीसींच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
