मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं.
शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, भारत बंदला पंजाब हरयाणा वगळता देशात कुठेही प्रतिसाद मिळणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही केंद्र सरकार ची भूमिका आहे.त्यासाठी शेतकरी संघटनांशी चर्चा होत असुन यावर सकारात्मक तोडगा निघेल. कायद्यात सुधारणा होईल मात्र सर्व कायदाच रद्द करण्याची टोकाची भूमिका शेतकरी संघटनांनी घेणे योग्य नाही. शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यामुळे कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. या कायद्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त जिथे कृषीमालाला अधिक मूल्य मिळेल तिथे विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.तरीही या कायद्यात ज्यावर आक्षेप घेण्यात येत आहे त्या मुद्द्यांवर बदल करण्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केले आजे.त्यानुसार शेतकरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चा करावी. उद्याचे भारत बंद चे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
दरम्यान,आजच्या ‘भारत बंद’वर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले आहे. या शेतकरी विधेयकामुळे बाजार समित्यात रुमाल टाकून सौदे करणाऱ्या दलाल आडत्यांना शेतकऱ्यांना फसवतां येणार नाही म्हणून आज या दलालाची बाजू घेत शेतकरी विरोधी बंद सुरू आहे असं त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- ‘शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दलालांची बाजू घेत शेतकरी विरोधी बंद सुरू आहे’
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

